वयाच्या २०व्या वर्षा पासून (१९२९) ते वयाच्या ५७ वर्षां पर्यंत (१९६५) या दरम्यान ३५ वर्षे रघुवीर सामंत सक्रिय लेखक होते.पहिले पुस्तक प्रकाशित – हृदय (शब्ददित्र) – २४-१२-१९३२. शब्दचित्र हा पूर्णपणे नवा वाङमयप्रकार सादर केला.

रघुवीर सामंतांच्या जीवनकालाचे (१९०९-१९८५) तीन प्रमुख भाग

  • १९०९ ते १९३८ – तीस वर्षे  बालपण – शालेय शिक्षण – पदवी. लेखक म्हणून स्थापित, लग्न करून गृहस्थाश्रमात प्रवेश, शिक्षकी पेशा अनुसरला.
  • १९३९ ते १९६५ –पंचवीस वर्षे सुरूवातीच्या १०-१२ वर्षांच्या अध्यापनाच्या काळात ते एक अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून अळखले जाउ लागले. त्याचवेळी ते एक तरूण लेखक, कवी आणि काव्यगाय़क म्हणून देखील कार्यरत होते. साहित्यात नवनवे प्रयोग करणारा हरहुन्नरी लेखक म्हणून नाव झाले. त्यानंतरची पुढील दशकभर वर्षे त्यांनी मराठी साहित्यातील विविध प्रकारात तसेच चित्रपट, पर्यटन आणि शिक्षण यासारख्या सर्जनशील क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान दिले. स्वतःची सर्व पुस्तके स्वतःच्याच प्रकाशनाद्वारे प्रकाशित करणारा लेखक ही त्याची एकमेव विशेष ओळख. एकंदर ही पंचवीस वर्षे त्यांच्या योगदानाची महत्वाची वर्षे होती. एक साहित्त्यिक म्हणून त्यांचा वाङ्मयीन कर्तुत्वाचा कालखंड १९२९-१९६५ असा ३६ वर्षांचा होता असे दिसते.
  • १९६५ ते १९८५ – वीस वर्षे १९६५ पासून पुढील वीस वर्षांचा काळ हा उतरणीचा काळ होता.. १९६५-६६ मधे वयाच्या ५६ व्या वर्षी, प्रकृती बिघडल्यामुळे, त्यांना ऐच्छिक सेवानिवृत्ती स्वीकारावी लागली. ही शेवटची २० वर्षे घरात समाजात व साहित्यिक वर्तुळात “नाकारलेल्या अस्तित्वाची” म्हणून व्यतीत केली.. ज्यात त्याना जीवनातील प्रत्येक बाबतीत व्यावहारिक दृष्टिकोनातून नैतिक निकषांमधे सामान्य बिघाड झालेला पहायला मिळाला.. इतके की, त्याला योग्य अशी पेन्शन देखील मिळविण्यात ते अपयशी ठरले. ते स्वत:ला  बदललेल्या जगाशी जुळवून घेउ शकले नाहीत. त्यांनी बदललेल्या समाजाबद्दल नाराजी अणि कीव व्यक्त केली.

रघुवीर सामंतांच्या साहित्याचे प्रकारानुसार वर्गीकरण,शीर्षके, व अन्य तपशील

घुवीर सामंतांची कालक्रमानुसार प्रकाशित केलेली सर्व पुस्तके

रघुवीर सामंतांच्या प्रकाशित पुस्तकांतील शब्दचित्र, कथा, निबंध, व काव्य यांची यादी