(कॉपीराइट दृष्टिकोनातून सुस्पष्ट कल्पना देण्याचे उद्देशाने केलेले सप्ष्टिकरण) –

  • कै रघुनाथ जगन्नाथ सामंत (उर्फ रघुवीर सामंत उर्फ कुमार रघुवीर) यांचे निधन दि १७-०९-१९८५ ( सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंचाऐंशी) रोजी झाले. कायदेशीर (कॉपी राइट) तरतुदींनुसार कुणाही लेखकाच्या मृत्युपश्चात पुढे एक वर्षाच्या कालावधी पासून मोजलेली साठ वर्षे इतक्या काळापर्यंत त्याने नेमलेल्या व्यक्ती अथवा संस्था अथवा त्याचे कायदेशीर वारसदार अथवा कुटुंबातील अन्य वारसाहक्काने पात्र असलेल्या एक किवा अनेक व्यक्ति (स्वतंत्रपणे वा एकत्रितपणे व/वा समन्वयाने) त्या लेखकाच्या लेखनाचे कायदेशीर वारसदार असतात.   
  • इथे कै रघुनाथ जगन्नाथ सामंत (उर्फ रघुवीर सामंत उर्फ कुमार रघुवीर) यांचे बाबतीत, अन्य प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या भाषांतर-रूपांतर अथवा रसग्रहणात्मक प्रकारची असलेली प्रकाशित पुस्तके, तसेच “मृगजळातली नौका” (१९४० लेखक जे पी नाइक) आणि “काव्याची भूषणे” (१९४८ लेखक म. वा. धोंड) ही सामंतांच्या पारिजात प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली दोन पुस्तके सोडून, अन्य साऱ्या (म्हणजे संख्येने अंदाजे ४० किंवा त्याच्या आसपास असलेल्या) त्यांच्या सर्व पुस्तकांच्या प्रकाशित लेखनावरचे तसेच अप्रकाशित हस्तलिखित लिखाणाचे त्यांचे हक्क त्यांचे मृत्युसमयी (दि १७-०९-१९८५ रोजी) त्यांचेकडे अबाधित होते. त्यांच्या मृत्युपश्चात् ते अधिकार प्रथमतः त्यांची पत्नी श्रीमती स्नेहल रघुवीर सामंत यांचेकडे गेले. श्रीमती स्नेहल रघुवीर सामंत यांच्या दि २२-१०-२००६ च्या निधनानंतर सध्या ते सर्व अधिकार इतर कुटुबीयांकडे नैसर्गिकरीत्याच आलेले आहेत.
  • या अधिकारांची मर्यादा कै रघुनाथ जगन्नाथ सामंत (ऊर्फ रघुवीर सामंत ऊर्फ कुमार रघुवीर) यांच्या दि १७-०९-१९८५ या निधनाच्या तारखेपासून पुढे एक वर्षानंतरची साठ वर्षे अर्थात् दि १६-०९-२०४६ या कालमर्यादे पर्यंत यथास्थित सुरक्षित आहेत याची नोंद सर्वांनी घ्यावी. सध्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांचे वतीने श्री दीपक रघुवीर सामंत हे (सर्वात वरिष्ठ या नात्यानी) याबाबत जबाबदार आहेत. सबब, सदर अधिकारांबाबत कोणताही पत्रव्यवहार अथवा बोलणे करण्यास श्री दीपक सामंत हे जबाबदार व सक्षम आहेत. परिस्थितिनुरूप या रचनेत बदल होऊ शकेल. ते वेळोवळी सूचित होईल.
  • वरील प्रमाणे परिस्थिति व तपशील लागू असले तरीही हे संकेतस्थळ निर्माण करण्यामागचा आमचा हेतु विचारात घेऊन सद्य स्थितीत खालील तपशील लागू होतील हे सर्वासाठी जाहीर करीत आहे –
  • या संकेत स्थळावरील मुक्त वापरास खुले केलेले सर्व साहित्य व उतरवून घेण्यायोग्य भाग वैयक्तिक वाचन, अभ्यास व संशोधनपर कामासाठी मुक्तपणे वापरावेत. त्या वापरास अधिकृत उत्तेजन आहे व तो संकेत स्थळाचा उद्देश आहे.
  • वरील उद्देशात बसेल अशा स्वरूपाच्या संदर्भात परंतु सार्वजनिक व/अथवा उदधृत करण्यासाठी यातील कोणताही भाग वापरण्यापूर्वी, औचित्याचा भाग म्हणून आगाऊ कळवून तसा वापर करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्स्थांनी संमति घेणे अपेक्षित व आवश्यक आहे. तशी आगाउ पूर्वसूचना जरूर देण्यात यावी. आम्ही पूर्वसूचना देउन अशा वापर केल्यास त्या विरूद्ध नाही. तोही या संकेतस्थळाचा एक हेतु आहे.
  • मात्र, वरील दोन प्रकारात न बसणारा व/वा अन्य कसलाही व विशेषकरून धंदेवाईक वापर, कमर्शियल व/अथवा जेथे कोणत्याही स्वरूपात मूल्य आकारणे, किंमत, मेहेनताना घेणे व/अथवा मानधन देणे-घेणे यांचे सापेक्ष या संकेतस्थळावरील माहितीचा अथवा कोणत्याही भागाचा वापर करावयाचा उद्देश असेल अशा बाबत कॉपी राइट होल्डर्स कडून आगावू सुस्पष्ट व लेखी स्वरूपात अटी-शर्तीसह परवानगी घेतल्या शिवाय तो करू नये. असा वापर कायदेशीर कारवाईस पात्र असेल कारण या संकेतस्थळावरील कोणतेही साहित्य “ओपन सोर्स” नाही.

दीपक रघुवीर सामंत
रो हाऊस क्रमांक ७,शिवपार्वती स.गृ. नि. सं. (म.)
सेक्टर – २१, नेरूळ (पू), नवी मुंबई ४००७०६,
टे -०२२ २७७०३९३३. मो – +९१ ९३२२२९०८१४.
drs0100@yahoo.com
२६-०७-२०